Blog

  • काँग्रेस अन् MIM सोबत युती कराल तर कारवाई होईल – देवेंद्र फडणवीस

    अकोला: अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली आहे. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड व्यक्त केली आहे.

    अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकासमंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

    एका मिडिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

  • सौर ऊर्जेतील महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने सौर ऊर्जा क्षेत्रात नवा मैलाचा दगड गाठत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अल्पावधीत उभारण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील सौर कृषिपंप प्रकल्पांमुळे ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

    राज्य सरकारच्या MSEDCL आणि Magel Tyala Solar Krushi Pump Yojana (MTSKPY) अंतर्गत एकाच महिन्यात रेकॉर्ड ब्रेक सौर पंप बसवले गेले आहेत. मागील महिन्यात 27 ऑक्टोबर पासून ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत तब्बल 45,911 सौर कृषी पंप बसवणे पूर्ण झाले. ज्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्राची नोंद करण्यात आली आहे.

    या उपक्रमामुळे लाखो शेतकऱ्यांना दिवसा अखंड व मोफत सौरऊर्जेवर चालणारे पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या रेकॉर्डमुळे महाराष्ट्र देशातील सौर ऊर्जेचा अग्रगण्य राज्य म्हणून ठळकपणे समोर आले आहे. ग्रीन एनर्जीचा प्रसार, कार्बन उत्सर्जनात घट आणि शेतीला शाश्वत ऊर्जा पुरवठा यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या धोरणांचे हे मोठे यश मानले जात आहे. सौरऊर्जा विस्ताराच्या पुढील टप्प्यांमध्ये आणखी मोठे प्रकल्प, ग्रामीण भागात स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या योजना जाहीर करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.

  • केंद्राचा महाराष्ट्राला आणखी एक गिफ्ट! नेरूळ – ऊरण – बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांसाठी एक खास बातमी दिली आहे. आता बेलापूर आणि नेरुळमधून उरणला जाण्यासाठी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली.

    अनेक दिवसांपासून उरण येथील नागरिकांकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीला आता यश आले आहे. नेरुळ ऊरण-नेरुळ (4 फेऱ्या) व बेलापूर-ऊरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच तारघर व गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहेत.

    “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-ऊरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-ऊरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • ‘ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह’ मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील अद्भुत बोगदा प्रकल्प!

    ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीन चा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. अखेर या प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यावेळी ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्ट येथून पहिले टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) भूगर्भात सोडण्यात येणार आहे. या टीबीएमच्या माध्यमातून ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारीकरण केले जाईल.

    प्रकल्पाचा मुख्य उद्देश –

    चेंबूरहून सीएसएमटीपर्यंत पूर्व मुक्त मार्गाने अतिवेगाने आल्यानंतर मरीन ड्राईव्ह, चर्चगेटकडे जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. ही वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर-मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.

    – प्रकल्पाचा खर्च: ₹ 8056 कोटी, पूर्णत्वाचा कालावधी: 54 महिने

    – प्रकल्पाचे मुख्य फायदे- मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.

    – प्रवासाचा वेळ 15-20 मिनिटांनी कमी होईल. इंधनाची बचत होईल.

    – ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

    – हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) च्या 50 मी. खालून जातो.

    – प्रकल्पाची एकूण लांबी 9.96 किमी आहे, ज्यामध्ये जवळपास 7 किमी भुयारी मार्ग आहे.

    – प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते, 1 पदरी आपत्कालीन रस्ता असेल. दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग 80 किमी/तास इतकी असेल.

    – दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी 300 मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.

    – बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

    – आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेश्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.

    – प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.

  • “निवडणूक आयोगाची ही पद्धत योग्य नाही” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली व्यक्तिगत नाराजी!

    स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल 2 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला घेण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्व 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता एकच दिवशी, 21 डिसेंबर एकत्र जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिला.

    लागोपाठ निवडणूक आल्याने मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये व प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी यासाठी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अचानक घेतलेल्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका पुढे नेणे हे कुठल्याच तत्वात बसत नाही असे स्पष्ट मत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. कायद्याचा चुकीचा अर्थ लावत निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

  • मोदी सरकारचे दहशतवादाला ठोस उत्तर, धोरणांमध्ये झालेला कठोर बदल!

    काँग्रेसच्या सत्ताराजातील 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेसाठी एक मोठा धक्का ठरला. या हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी, समन्वयातील कमतरता आणि किनारी सुरक्षेतील उणिवांवर गंभीर लक्ष केंद्रित झाले. परिणामी, पुढील कालावधीत मोदी सरकारने सुरक्षा क्षमता मजबूत करण्यासाठी संघटनात्मक व तांत्रिक सुधारणा केल्या. NIA, NSG हब्स, कोस्टल रडार चेन, क्विक रिस्पॉन्स टीम्स यांसारखे महत्त्वाचे बदल याच काळात वेगाने राबवले गेले. त्यामुळे दहशतवादी धोके ओळखणे, रोखणे आणि त्वरित प्रतिसाद देणे यातील भारताची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली.

    सुरक्षा धोरणातील प्रगत पावले –

    गेल्या दशकभरात भारताच्या सुरक्षा धोरणात अधिक तांत्रिक आणि आक्रमक दृष्टिकोन विकसित होत गेला. सीमांवर स्मार्ट फेन्सिंग, ड्रोन सर्व्हेलन्स, नाईट-व्हिजन प्रणाली, आधुनिक कमांड सेंटर्स यांसारख्या उपायांनी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम बनली. गुप्तचर माहितीचे केंद्रीकरण वाढवून बहु-स्तरीय इंटेलिजन्स नेटवर्क तयार करण्यात आले, ज्यामुळे दहशतवादी कारवायांना वेळीच आळा बसू लागला. मोदी सरकारने सरकारने आपल्या कार्यकाळात सुरक्षा, संरक्षण आणि दहशतवादविरोधी क्षमतेवर सातत्याने गुंतवणूक केली. यामुळे आज भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्भीड नेतृत्वाखाली अधिक सक्षम, सज्ज आणि दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देण्यास समर्थ असा राष्ट्र म्हणून उभा आहे.

  • “जोपर्यंत मी CM, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; मुख्यमंत्र्यांचा शब्द

    “मी माझ्या बहिणींना सांगतो की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत ते बोलत होते.

    फडणवीस म्हणाले, “राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधकांनी आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होणार म्हणून नरेटीव्ह पसरवले. परंतु विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झाले तरी सर्व योजनांचे पैसे सुरू आहेत. लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज, पिक विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!